महाराष्ट्र भूमी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे पुन्हा एकदा 10 फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन ते करणार असून याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून निर्देश जारी करण्यात आले आहे.तसेच विमानतळ, सहार ,कुलाबा, एमआरए मार्ग, एमआयडीसी आणि अंधेरीच्या कार्यक्षेत्रात ड्रोन आणि उड्डाण क्रियाकलापांवर बंदी घालण्यात आली आहे.
यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून भारतीय दंड संहितेच्या कलम १४४ अंतर्गत प्रतिबंधात्मक निर्देश जारी करण्यात आले असून यानुसार, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी फ्लाइंग ऑब्जेक्ट्सवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये ड्रोन, पॅराग्लायडर्स, सर्व प्रकारचे फुगे, पतंग आदींचा समावेश आहे.
हेही वाचा – हळदीच्या दुधाचे सेवन करणे शरीरासाठी धोकादायक? वाचा सविस्तर
दरम्यान, पंतप्रधान मोदी १० फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून दोन्ही वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या दोन्ही गाड्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी येथे तयार करण्यात आल्या आहेत.आतापर्यंत वंदे भारत ट्रेन 8 मार्गांवर धावली असून यामध्ये नवी दिल्ली-वाराणसी, नवी दिल्ली-वैष्णो देवी, गांधीनगर-मुंबई, दिल्ली-अंब अंदौरा, चेन्नई-म्हैसूर, नागपूर-बिलासपूर, हावडा-न्यू जलपाईगुडी आणि विशाखापट्टणम-सिकंदराबाद यांचा समावेश आहे.