महाराष्ट्र भूमी: आज (10 फेब्रुवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते मुंबई ते शिर्डी तसेच मुंबई ते सोलापूर (Mumbai Solapur) वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण करण्यात आले. सीएसटी रेल्वे स्टेशनवर हा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी मोदींनी ‘रेल्वेच्या क्षेत्रात आज मोठी क्रांती होतेय. नववी आणि दहावी वंदे भारत ट्रेन समर्पित करताना मला अत्यंत आनंद होतोय….’,असे म्हणत मराठीतून आपल्या भाषणाची सुरुवात केली.
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, इतर महाराष्ट्राचे मंत्री, आमदार, खासदार व इतर बंधू-भगिनी आजचा दिवस महाराष्ट्रातील आधुनिक कनेक्टिव्हिटिच्या दृष्टीने खूप मोठा आहे. प्रथमच एकाच दिवशी दोन वंदे भारत ट्रेन सुरु झाल्या आहेत. मुंबई आणि पुणे या शहरांना आधात्मिक ठिकाणांना जोडेल. शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक, पर्यटक, भाविकांसाठी या ट्रेन महत्त्वाच्या आहेत. शिर्डीत साईबाबांचं दर्शन घ्यायचं असेल, नाशिकचं रामकुंड, त्र्यंबकेश्वर, पंचवटीचं दर्शन करणं वंदे भारत ट्रेनमुळे सोपं होणार आहे. मुंबई सोलापूर वंदे भारत ट्रेनमुळे अक्कलकोटचे स्वामी समर्थ, आई तुळजाभवानीचं दर्शन सुलभ होणार.”,असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
हेही वाचा- “…तो निर्णय सोनिया गांधींचाच होता”,राऊतांच्या टीकेनंतर नाना पटोलेही बरसले!
तसेच पुढे ते म्हणाले की, “आधुनिक भारताचे हे खूप शानदार चित्र आहे. हे वेगवान भारताचं प्रतिबिंब आहे. देश खूप वेगाने वंदे भारत ट्रेन लाँच करत आहे. आतापर्यंत 10 ट्रेन सुरु झाल्या आहेत. 17 राज्यांतील 108 जिल्हे वंदे भारत एक्सप्रेसशी कनेक्ट झाले आहेत.आज मुंबईतील नागरिकांचं जीवन सुलभ करण्यासाठी कॉरिडोअरचं लोकार्पण झालंय. त्यामुळे इस्ट-वेस्ट कनेक्टिव्हिटी सोपी झाली आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांची कनेक्टिव्हिटी वाढली आहे. मुंबईकरांना यासाठी मी शुभेच्छा देतो.”,असे मोदींनी म्हटले.