काठमांडू:
नेपाळमध्ये शुक्रवारी सकाळी भूस्खलन झालं. त्यावेळी तिथून दोन बस जात होत्या. दरड बस वर कोसळल्यानंतर दोन ही बस नदीत गेल्या. नदीला पुर आला असल्याने या दोनही बस वाहून गेल्या. या बसमध्ये जवळपास 60 प्रवाशी प्रवास करत होते. हे सर्व प्रवाशी आता वाहून गेले असून त्यांचा कोणताही पत्ता लागलेला नाही. या मध्ये 7 प्रवाशी हे भारतीय होते. एका पोर्टलने याबाबतचे वृत्त दिले आहे.
(‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबस जवळपास 65 प्रवाशांना घेवून जात होते. या बस चितवन जिल्ह्यातील सिमलताल भागात पोहचल्या होत्या. त्याच वेळी नारायणघाट – मुगलिंग मार्गावर भूस्खलन झालं. त्याच वेळी यामार्गावत या बस होत्या. अचानक झालेल्या भूस्खलनाच्या कचाट्यात या बस सापडल्या. बाजूनचे त्रिशूली नदी वाहते. या नदीत जावून याबस पडल्या. पण नदीच्या पाण्याचा झोत हा मोठा होता. त्यामुळे या बस नदीच्या पाण्यात वाहून गेल्या. नेपाळमध्ये पावसाचा जोर आहे. त्यामुळे वेगवेगळ्या घटनांमध्ये आता पर्यंत 11 जणांनी आपला जीव गमावला आहे. दरम्यान बसला झालेल्या अपघाताची माहिती चितवनचे जिल्हाधिकारी इंद्र देव यादव यांनी दिली आहे. बीरगंज ते काठमांडूला चाललेली एंजेल बस आणि राजधानी वरून गौरसाठी चाललेली गणपती डिलक्स या दोन बस या भूस्खलनाच्या कचाट्यात सापडल्याचे यादव यांनी सांगितले.
एंजेल बसमध्ये 24 प्रवाशी होते. तर गणपती डिलक्समध्ये 41 जण प्रवास करत होते. ‘द काठमांडू पोस्ट’ ने दिलेल्या वृत्ता नुसार गणपती डीलक्समधील तिन जणांनी गाडीतून उडी मारली. त्यामुळे ते तिघेही बचावले. एंजेल बस मधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची माहिती मिळाली असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितले आहे. शिवाय यात सात भारतीय होते असेही स्पष्ट केले आहे. या पैकी सात जणांची ओळख पटली आहे. त्यात संतोष ठाकुर, सुरेंद्र शाह, आदित मियान, सुनील, शाहनवाज आलम और अंसारी यांचा समावेश आहे.
प्रधानमंत्री पुष्प कमल दाहाल ‘प्रचंड’ यांनी या दुर्घटनेबाबत दुख: व्यक्त केले आहे. शिवाय अपघात ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. प्रचंड यांनी सोशल मीडियावरही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. झालेल्या अपघाताबाबत त्यांनी दुख व्यक्त केले आहे. त्यांनी गृह विभागाला बचाव कार्य हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत.