महाराष्ट्र भूमी : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.कार आणि लग्झरी बसची धडक होऊन हा अपघात झाला.दरम्यान,डहाणू तालुक्यातील चारोटीपासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असेलल्या महालक्ष्मी मंदिराजवळ आज (31 जाने.) पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेनंतर नजीकच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कारनं बसला धडक बसली आणि हा अपघात झाला. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या या मार्गावर हा अपघात झाला आहे.तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हा अपघात एवढा भीषण होता की, कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.कारमधील सर्व प्रवाशी गुजरातच्या बारडोलीमधील राहणारे होते.
हेही वाचा – “सरकारचे कौतुक करणारे भजनी मंडळ म्हणजे…”,सत्ताधाऱ्यांवर कोणी साधला निशाणा?
दरम्यान,अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.तसेच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील कार्यवाहीसाठी सर्व मृतदेह कासा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.तसेच या घटनेप्रकरणी चौकशी सुरू आहे.