महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home राजकारण

      पाठीत बॅग, हातात बंदूक, चंद्रपुरात मनसे पदाधिकाऱ्यावर गोळीबार, गुन्ह्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

      Shubham Tagad by Shubham Tagad
      July 4, 2024
      in राजकारण
      0
      पाठीत बॅग, हातात बंदूक, चंद्रपुरात मनसे पदाधिकाऱ्यावर गोळीबार, गुन्ह्याचा थरार कॅमेऱ्यात कैद
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      चंद्रपुरात मनसे पदाधिकाऱ्यावर गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. या गोळीबारात संबंधित मनसे पदाधिकारी जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पण या घटनेमुळे चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे.

      चंद्रपुरात भर दिवसा गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक तरुण पदाधिकारी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटना जिथे घडली तो परिसर अत्यंत रहदारीचा आहे. असं असताना गोळीबाराची घटना घडल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. इतकी रहदारी असणाऱ्या परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने गुन्हेगारांना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. विशेष म्हणजे आरोपीने याआधीदेखील मनसे कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुखाच्या भावावर गोळी झाडल्याची घटना घडली आहे. तसं असताना आता पुन्हा तशी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      नेमकं काय घडलं?

      चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे. या गोळीबारात अमन अंधेवार नामक युवक जखमी झालाय. अमन हा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा जिल्हाप्रमुख असल्याची माहिती समोर येत आहे. याच संकुलात त्याचे कार्यालय आहे. जुन्या वैमनस्यातून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

      वर्षभरापूर्वी याच ठिकाणी त्याच आरोपीने अमनच्या लहान भावावर गोळीबार करून पळ काढला होता. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले रघुवंशी कॉम्प्लेक्स हे व्यावसायिक संकुल आहे. हा परिसर प्रचंड गर्दीचं आणि गजबजलेलं असतं. त्यामुळे इथे गोळीबार झाल्याने पोलीसही चक्रावले आहेत. घटनेची लागलीच दखल घेत पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

      सीसीटीव्हीत घटना कैद

      गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मनसे पदाधिकारी अमन अंधेवार फोनवर बोलत होते. यावेळी तिथे एक व्यक्ती येतो. त्याच्या पाठिवर बॅग असते. तो अंधेवार यांच्या पाठीमागून येतो. यानंतर तो बॅगेतून बंदूक काढतो आणि अमन यांच्यावर गोळीबार करतो. यावेळी अमन यांना गोळ्या लागतात. पण तरीही ते जीव वाचवण्यासाठी पळतात. दुसरीकडे आरोपीदेखील गोळीबार करुन तिथून धूम ठोकतो.

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम