महाराष्ट्र भूमी : भारतीय विद्यापीठ संघटना, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि एमजीएम विद्यापीठाच्या वतीने औरंगाबाद येथे १४ ते १७ फेब्रुवारी दरम्यान अखिल भारतीया आंतरविद्यापीठ रोड सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात अली आहे. या मुळे औरंगाबादला एक वेगळी ओळख मिळेल अशी प्रतिक्रिया एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू विलास सपकाळ यांनी दिली आहे. एमजीएम युनिव्हर्सिटीला अशा राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजक होण्याची संधी दुसऱ्यांदा मिळाली आहे. २०२२ मध्ये राष्ट्रीय सॉफ्ट टेनिसचे आयोजन भारतीय विद्यापीठ संघटना आणि एमजीएम विद्यापीठाने केले होती. अशी माहिती पत्रकार परिषदेत बोलताना कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांनी दिली.
हेही वाचा : ‘पठाण’ च्या अॅडव्हान्स बुकिंगवर साध्वी प्राची यांनी ट्विटद्वारे लगावला खोचक टोला
देशभरातील ४६ विद्यापीठातील ३७६ खेळाडू यात समावेश घेणार आहे. त्यात १९८ पुरुष तर १२४ महिला असणार आहे. तसेच ५४ व्यवस्थापक व प्रशिक्षक या स्पर्धेसाठी येणार असून. २० पंचांची देखील या स्पर्धेसाठी निवड केली आहे. तसेच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, औरंगाबाद ग्रामीण पोलीस आणि औरंगाबाद सायकल असोशिएशन यांनी देखील सहकार्य लाभणार आहे. अशी माहिती एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी दिली आहे.
सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा दुपारी ४. ३० वाजता एमजीएम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे होणार आहे. यावेळी औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ निखिल गुप्ता. भारतीय राष्ट्रीय प्राधिकरणाचे डीजीएम तथा संचालक रवींद्र इंगोले एआययुचे प्रतिनिधी व्ही सिनु कुमार स्पर्धा व्यवस्थापक प्रताप जाधव इत्यादीची उपस्थिती असणार आहे. तसेच १४ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा पहिला दिवस असणार आहे. स्पर्धा १४ फेब्रुवारी रोजी ७ वाजता सोलापूर धुळे महामार्गावर सुरु होईल. तसेच १५ ते १७ या तारखेलाही याच स्थळावर स्पर्धा असेल.