महाराष्ट्र भूमी: माजी मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ धडाडणार आहे. भाजप आणि शिंदे गटाचे अनेक मोठे नेते आज वरळी येथे हजेरी लावणार आहेत.वरळी स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात आज संध्याकाळी सहा वाजता सभा होणार आहे.
मच्छिमार बांधवांच्या वतीने वरळीत भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार होणार आहे. मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीमधून निवडणूक लढविण्याचे थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी दिले होते.त्यामुळे आजच्या सभेत शिंदे यावर काय बोलणार, ठाकरेंचे हे आव्हान स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा- “जितेंद्र आव्हाडांचं डोकं आऊट झालंय”,कोणी केली टीका?
दरम्यान, वरळी भोईवाडा समिती आणि सर्वोदय नाखवा समिती यांच्या माध्यमातून या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन वरळीमध्ये केले जाणार आहे.