ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती संभाजीनगरात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. येणाऱ्या सात जुलैला भाजपाच्या अनेक माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश होणार आहे. या प्रवेशाने मंत्री अतुल सावे यांना मोठा धक्का निवडणुकीत बसेल. संजय शिरसाठ यांच्याही अडचणी वाढण्याच्या दाट शक्यता आहे.. नगरसेवकांमध्ये उपमहापौर, स्थायी समितीच्या सभापती राहिलेल्या नगरसेवकांचा समावेश. यातील एका नगरसेवकांनी गत निवडणुकीमध्ये विधानसभा ही लढवलेली आहे. यात 6 ते 8 माजी नगरसेवक,1 जिल्हा परिषद सदस्य,2 पंचायत संमती,1 तालूका अध्यक्ष,1 युवा मोर्चा अध्यक्ष, 5 मंडळ अध्यक्ष यांचा समावेश आहे.
(‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हे हि वाचा :- भारतीय मानवी मोहिमेचा मुहुर्त ठरला, गगनयान आणि समुद्रयानाचे सदस्य निश्चित झाले