महाराष्ट्र भूमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज (29 जाने.)औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत.महाराष्ट्राचा 56 वा प्रांतीय निरंकारी संत समागम या सोहळ्याचे आयोजन औरंगाबादच्या (Aurangabad) बिडकीन डीएमआयसीमध्ये (DMIC) करण्यात आले आहे. औरंगाबादेत पहिल्यांदाच 27 ते 29 जानेवारीदरम्यान आध्यात्मिक सोहळा पार पडत आहे.दरम्यान, याच सोहळ्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आज औरंगाबाद दौऱ्यावर येणार आहेत. तसेच मुख्यमंत्री शहरात येणार असल्याने पोलिसांकडून चांगलाच बंदोबस्त करण्यात आला आहे.
हेही वाचा – “बंदुकांच्या जोरावर तात्पुरती शांतता…”,केंद्र सरकारला कोणी डिवचले?
असा असेल संपूर्ण दौरा :
दुपारी 12 वाजता: वर्षा शासकीय निवासस्थान मुंबई येथून मोटारीने मुंबई विमानतळाकडे प्रयाण
दुपारी 12:30 वाजता: मुंबई विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने औरंगाबादकडे प्रयाण
दुपारी 1:30 वाजता: औरंगाबाद विमानतळ येथे आगमन व मोटारीने बिडकीन औरंगाबादकडे प्रयाण
दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत: निरंकारी संत समागम कार्यक्रमास उपस्थित राहणार
दुपारी 3 वाजता: डीएमआयसी बिडकीन येथून मोटारीने औरंगाबाद विमानतळाकडे रवाना
दुपारी 3:30 वाजता: औरंगाबाद विमानतळ येथून शासकीय विमानाने पुणे विमानतळकडे रवाना