महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home महाराष्ट्र

      कोकणात होणार देशातील पहिलं सागरी विद्यापीठ, मुख्यमंत्र्यांनी दिली गुडन्यूज

      Shubham Tagad by Shubham Tagad
      July 4, 2024
      in महाराष्ट्र
      0
      कोकणात होणार देशातील पहिलं सागरी विद्यापीठ, मुख्यमंत्र्यांनी दिली गुडन्यूज
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारताच्या पहिल्या सागरी विद्यापीठाच्या माध्यमातून समुद्रासंबंधित विषयांवर सविस्तर अभ्यास करता येणार आहे.

      First Maritime University In Konkan : देशातील पहिलं सागरी विद्यापीठाची लवकरच स्थापना होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देशातील पहिलं सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय स्थापन केले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे भारताच्या पहिल्या सागरी विद्यापीठाच्या माध्यमातून समुद्रासंबंधित विषयांवर सविस्तर अभ्यास करता येणार आहे.

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यात देशातील पहिलं सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय स्थापन केले जाणार असल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीत सागरी विद्यापीठ आणि शासकीय विधी महाविद्यालय व्हावे, अशी मागणी केली जात होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीसाठीच्या या दोन्ही मागण्यांना मंजुरी दिली आहे.

      या सागरी महाविद्यालयाला 500 ते 600 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तर विधी महाविद्यालयाला २५ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यालाही तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. यामुळे आता समुद्रावर अभ्यास संशोधन करणाऱ्यांना नवीन संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 50 एकर जागा देण्यास तयार असल्याचे पत्रही उदय सामंत यांनी सांगितले.

      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मार्च महिन्यात कोकण दौऱ्यादरम्यान याबद्दलची घोषणा केली होती. कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक कामे करणे प्रस्तावित आहेत. या विकासाअंतर्गत विविध योजनांसह रत्नागिरी येथे देशातील पहिले सागरी विद्यापीठ सुरु करणार असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली होती. शिवसेनेच्या शिवसंकल्प अभियानाच्या मेळाव्यात त्यांनी याबद्दल भाष्य केले होते.

      अखेर आता एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीसाठीच्या या दोन्ही मागण्यांना मंजुरी दिली आहे. यामुळे भारताच्या पहिल्या सागरी विद्यापीठाच्या माध्यमातून समुद्रासंबंधित विषयांवर सविस्तर अभ्यास करता येणार आहे. ज्यात समुद्र विज्ञानापासून समुद्राचा इतिहास, नियम, संशोधन इत्यादी विषयांचा अभ्यास करता येणार आहे.

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम