महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home राजकारण

      1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका’; पत्रक छापत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर ठाकरे गटाची उपरोधिक टीका

      Shubham Tagad by Shubham Tagad
      July 2, 2024
      in राजकारण
      0
      1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका’; पत्रक छापत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर ठाकरे गटाची उपरोधिक टीका
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      Mukhyamantri Ladki Bahin Yojana : अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मांडलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला सुरुवात झाली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाने महायुती सरकारवर निशाणा साधला.

      नाशिक : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात मांडलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेला सुरुवात झाली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. सोमवारी 1 जुलैपासून या योजनेला सुरुवात झाली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाने राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका, असे पत्रकार छापून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर उपरोधिक टीका केली आहे.

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      नाशिकमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा दराडे यांच्या वतीने पत्रक छापण्यात आले आहेत. त्यात महिलांना योजनेची माहिती देणाऱ्या पत्रकावर मजकूर छापून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर टीका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. आमच्या प्रभागात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे योजनेचा लाभ मिळवून देत सरकारवर टीका करणार, अशी भूमिका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याचे बाळा दराडे यांनी म्हटले आहे.

      1500 रुपये घ्या, पण गद्दार म्हणू नका
      ठाकरे गटाचे पदाधिकारी बाळा दराडे म्हणाले की, या सरकारचे आयुष्य केवळ दोन-तीन महिन्याचे राहिले आहे. जर गरीब महिलांना 1500 रुपये मिळत असतील, तर त्यांना 1500 रुपयांपासून वंचित का ठेवायचे? सरकारने सर्वसामान्य जनतेचा पैसा लुटला आहे आणि तोच पैसा वेगळ्या माध्यमातून ते जनतेपर्यंत पोहोचवतील. हे सरकार गद्दारी करून जन्माला आले आहे. त्यामुळे राज्यात या सरकारची बदनामी झाली आहे. लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेने सरकारला धूळ चारली. विधानसभेत देखील हे सरकार पायउतार होणार असल्याची जाणीव झाल्यामुळे 1500 रुपये देतो, पण आम्हाला गद्दार म्हणू नका, अशी त्यांनी योजना काढली आहे. आम्ही शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने महिलांना 1500 रुपये मिळवून देणार आहोत, तसेच सरकारचा धिक्कार करून आम्ही आंदोलन करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. बाळा दराडे यांच्या आंदोलनाची सध्या नाशिकमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम