महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home राजकारण

      ‘आंदोलन कसे करावे’, पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना टोला

      Shubham Tagad by Shubham Tagad
      June 21, 2024
      in राजकारण
      0
      बीडमध्ये महायुतीचे सर्वाधिक आमदार, तरीही पंकजा मुंडे पराभूत; कोणत्या विधानसभेमुळे झाला दगा?
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं जालन्याच्या वडीगोद्री येथे गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. या आरक्षणाचं कौतुक भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. या माध्यामातून त्यांनी नाव न घेता मनोज जरांगे यांनाही टोला लगावला आहे.

      मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांचं अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे हे सगेसोयरेच्या मागणीसाठी ठाम आहेत. त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत राज्य सरकारला दिली आहे. सरकारने 13 जुलैपर्यंत सगेसोयरेबाबतचा निर्णय घेतला नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत आपण मराठा समाजाचे उमेदवार उभे करु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. मनोज जरांगे यांच्या या मागणीनंतर ओबीसी नेत्यांमध्ये नाराजी आहे. मनोज जरांगे यांची मागणी मान्य केली तर ओबीसी आरक्षणावर मोठा परिणाम होईल, अशी भीती ओबीसी नेत्यांना आहे. त्यामुळे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं जालन्याच्या वडीगोद्री येथे गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. या आरक्षणाचं कौतुक भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे. पंकजा यांनी यांनी ट्विट करत लक्ष्मण हाके यांची पाट थोपटली आहे. तर पंकजा यांनी या माध्यमातून मनोज जरांगे यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावल्याची चर्चा आहे.

      पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?

      “आंदोलन कसे करावे, सालस, अभ्यासपूर्ण आणि भावनांना हात घालताना मुद्दा मांडताना घटनेबद्दल आदर ठेवणे शिकायचे असेल तर वडी गोदरीमध्ये पहा…वाह रे वाह..”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने आज लक्ष्मण हाके यांची भेट घेतली. या भेटीनंतर देखील पंकजा मुंडे यांनी ट्विट करत भूमिका मांडली होती.

      “राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांचे शिष्टमंडळ हे लक्ष्मण हाके यांना वडीगोद्री येथे जाऊन भेटल्याचे समजते. ते योग्यच आहे. हाकेंचे उपोषण हे त्यांचे नसून हा कायद्याच्या चौकटीत सर्वाना समान न्याय व सन्मान देण्यासंदर्भातील आवश्यकता आहे. सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी. या साध्या त्यांच्या दोन मागण्या इतर मागण्यांसमवेत आहेत. शिष्टमंडळाने उपोषणास भेट दिली असली तरी राज्याच्या प्रमुखांनी तिथे जाऊन भेट द्यावी, म्हणजे या समस्त राज्यातील बहुजनांना सन्मान दिल्यासारखे होईल अशी माझी आग्रहाची विनंती आहे आणि ती मान्यच कराल हा मला विश्वास आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      राज्य सरकारची ओबीसी नेत्यांसोबत बैठक

      दरम्यान, लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 10 ओबीसी नेत्यांसोबत राज्य सरकारची बैठक सुरु आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक पार पडत आहे. या बैठकीत सरकार या ओबीसी नेत्यांना काय आश्वासन देतं? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्यात आता वाकयुद्ध रंगल्याचं बघायला मिळत आहे.

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम