महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home राजकारण

      विधानपरिषद निवडणूक : महायुतीची मतं फोडण्यासाठी पवार रिंगणात, मोठा नेता गळाला लागणार?

      Shubham Tagad by Shubham Tagad
      July 8, 2024
      in राजकारण
      0
      विधानपरिषद निवडणूक : महायुतीची मतं फोडण्यासाठी पवार रिंगणात, मोठा नेता गळाला लागणार?
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      Vidhanparishad Election 2024 : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वी शरद पवारांनी नवी खेळी केली आहे.

      मुंबई:

      Vidhanparishad Election 2024 : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्यानं ही निवडणूक चांगलीच चुरशीची बनली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आमदारांची घसरलेली संख्या तसंच बदलेली समीकरणं यानंतर ही पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. त्यातच आगामी विधानसभेपूर्वी होणारी ही शेवटची निवडणूक असल्यानं दोन्ही आघाडीकडून आपले उमेदवार जिंकून आणण्यासाठी जोरदार तयारी सुरु आहे.

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      शरद पवारांची नवी खेळी

      शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटील यांना या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं पाठिंबा दिलाय. जयंत पाटील यांच्यासाठी मतांची जुळवाजुळव करण्यासाठी शरद पवारांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. मुंबई जवळच्या पालघर जिल्ह्यातला बहुजन विकास आघाडी हा महत्त्वाचा पक्ष आहे. या पक्षाचे तीन आमदार आहेत. सध्या त्यांचा महायुतीला पाठिंबा आहे. पण,पालघर लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि बहुजन विकास आघाडी यांच्यात थेट सामना झाला होता. त्यामध्ये भाजपाचा उमेदवार विजयी झाला. आता आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पवार आणि ठाकूर यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. पवारांच्या भेटीनंतर ठाकूर काय निर्णय घेणार? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय. 

      राष्ट्रवादी काँग्रेसची जय्यत तयारी

      विधान परिषद निवडणुकीला मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंही जय्यत तयारी सुरु केलीय. वडणुकीच्या दृष्टीनं खबरदारीचा उपाय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमदारांसाठी हॉटेल बुक करणार आहे. राष्ट्रवादीचे या निवडणुकीत 2 उमेदवार रिंगणात आहेत. तर या पक्षाकडं हक्काची 43 मतं आहेत. विधानपरिषद निवडणुकीसाठी विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीला आणखी 3 मतांची आवश्यकता आहे. 


      विधानपरिषद निवडणुकीत कोणते उमेदवार रिंगणात?

      भाजपाचे उमेदवार
      पंकजा मुंडे
      परिणय फुके
      अमित बोरखे
      योगेश टिळेकर
      सदाभाऊ खोत

      शिवसेना (एकनाथ शिंदे )
      भावना गवळी
      कृपाल तुमणे

      राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)
      राजेश विटेकर
      शिवाजीराव गर्जे

      काँग्रेस
      डॉ. प्रज्ञा राजीव सातव

      शेतकरी कामगार पक्ष
      जयंत पाटील

      शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
      मिलिंद नार्वेकर

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम