महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home मुंबई

      ‘पक्षश्रेंष्ठींनी कारवाई केली नाही म्हणून डेअरिंग वाढली’, काँग्रेस आमदारानं सांगितलं गद्दारांचं सत्य

      Shubham Tagad by Shubham Tagad
      July 15, 2024
      in मुंबई
      0
      ‘पक्षश्रेंष्ठींनी कारवाई केली नाही म्हणून डेअरिंग वाढली’, काँग्रेस आमदारानं सांगितलं गद्दारांचं सत्य
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      Vidhan Parishad Election 2024 : विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची काही मतं फुटणार हे पक्षाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी यापूर्वीच सांगितलं होतं.

      मुंबई:

      विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये राजकारण चांगलंच तापलंय. या निवडणुकीत काँग्रेसमधील मतं फुटल्यानं महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. विशेष म्हणजे काँग्रेसची काही मतं फुटणार हे पक्षाचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. हा दावा खरा ठरल्यानंतर गोरंट्याल यांनी ‘NDTV मराठी’ ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये पक्षातील गद्दारांबाबतचं सत्य सांगितलं आहे.

      ‘गडबड होणार हा संशय होता’

      ‘विधिमंडळाचं अधिवेशन 25 जूनपासून सुरु झालं. मला तेंव्हापासूनच संशय होता. मोबाईलवर बोलणं, बाहेर काहींशी संपर्क साधणे यावरून हा संशय होता. 12 तारखेच्या निवडणुकीत हे काहीतरी गडबड करणार याची मला कल्पना आली होती, म्हणून 11 तारखेलाच मी माध्यमांना याबाबत सूचना दिली होती. जे संशयाच्या भोवऱ्यात होते त्यांना मी स्वत:घेऊन गेलो होतो. दिल्लीला रिपोर्ट गेला आहे. उरलेल्या 30 आमदारांवरही शंका घेतली जाऊ लागली आहे. त्यामुळे 19 तारखेला पक्षश्रेष्ठींनी नावे जाहीर करावी असी मागणी करणार आहे,’ असं गोरंट्याला यांनी सांगितलं. 

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      कोणते आमदार फुटले?

      कैलास गोरंट्याल यांनी यावेळी काँग्रेसचे कोणते उमेदवार फुटले याबाबत सूचक इशारा केला. मुंबई, नांदेड आणि मला वाटतं त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रातील आमदार आहेत. अमरावतीचेही आमदार असावेत, असं त्यांनी कुणाचंही नाव न घेता सांगितलं.

      ‘मी पोल खोलली त्यातले ३ परफेक्ट निघाले. कदाचित या तिघांपैकी एकाने माझे नाव दिले असेल. मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारले की माझे नाव येत आहे, त्यावर त्यांनी  यात तुमचे नाव नाही, हे स्पष्ट केलं. एका वर्तमानपत्राविरोधात मी अब्रूनुकसानीचा दावा टोकणार आहे. किती रकमेचा दावा करायचा हे वकील आणि मी बसून ठरवू,’ असं गोरंट्याल म्हणाले. 

      दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. त्या निवडणुकीचा उल्लेखही गोरंट्याल यांनी केला. ‘चंद्रकांत हंडोरे यांना पाडलं त्यावेळीच सगळ्यांची नावं समोर आली होती. अविश्वास प्रस्ताव आणला होता तेव्हाही काहीजण उशिरा आले होते. पक्षश्रेष्ठींनी यांच्यावर कारवाई केली नाही म्हणून यांची डेअरींग वाढली. आमचं काहीही होणार नाही, असं त्यांना वाटायला लागलं,’ असा घरचा आहेर गोरंट्याल यांनी दिला. 

      ‘सरकार आलं नाही तरी चालेल…’

      गेल्या वेळी काँग्रेसचे एक मोठे फुटले होते. त्यांच्यावर कारवाई करू नये असे काँग्रेस नेत्यांना त्यावेळी वाटत होते. कारण लोकसभा, विधानसभा निवडणूक होती. मात्र हे लोकं सुधारत नाही. गद्दारीची परंपरा त्यांनी चालू ठेवली. त्यांच्या चेलेचपाट्यांनीही तेच केले. त्यांना धडा शिकवला पाहीजे.  सध्या काँग्रेसचे  37 आमदार आहेत, त्यातील 7 गद्दार आहेत. त्यांच्यामुळे लोकं आमच्यासारख्या 30 इमानदार आमदारांवर संशय व्यक्त करू लागले आहेत. उद्या महाराष्ट्रात मविआचे सरकार नाही आले तरी चालेल पण गद्दारांचे नाव समोर आलं पाहिजे, अशी मागणी  कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. 
       

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम