महाराष्ट्र भूमी: संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या विधान परिषद निवडणुकांच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, निवडणूक निरीक्षक शेखर चन्ने, विभागातील सर्व जिल्हाधिकारी मतमोजणी केंद्रावर उपस्थित आहेत. एकूण 56 टेबलावर ही मतमोजणी प्रक्रिया होत आहे. या निवडणुकीत 14 उमेदवार रिंगणात असून जवळपास 53 हजार 257 शिक्षकांनी मतदान केलं आहे. मात्र, महाविकास आघाडीचे विक्रम काळे आणि भाजप युतीचे किरण पाटील (kiran patil) यांच्यात ही प्रमुख लढत समजली जाते. आता या दोघांपैकी कोण बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
“यावेळी मराठवाड्यात परिवर्तनाची लाट दिसेल.भाजप शिवसेना (शिंदे गट)युतीत माझा विजय होईल.”,असा विश्वास भाजपचे उमेदवार किरण पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते आज सकाळी माध्यमांशी संवाद साधत होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे विक्रम काळे यांना किरण पाटील पराभूत करणार का, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
हेही वाचा- Nashik Graduate Result : “मला कुणी चणे देत होते, कुणी फुटाणे…”, निकालापूर्वी कुणाचा गौप्यस्फोट?
दरम्यान, राष्ट्रवादीचे विक्रम काळे, भाजपचे किरण पाटील आणि राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेले प्रदीप सोळंके देखील मैदानात आहेत. आज सकाळीच निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. यावेळी तिन्ही उमेदवार एकत्र दिसून आले. चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा. लि. या कंपनीच्या शेड्समध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे.