महाराष्ट्र भूमी
  • मुख्यपृष्ठ 
  • ताज्या बातम्या
  • राजकारण
  • महाराष्ट्र

    Trending Tags

    • भारत
    • विश्व
    • मनोरंजन
    • व्यापार-उद्योग
    • कृषीवार्ता
    No Result
    View All Result
    महाराष्ट्र भूमी
    • मुख्यपृष्ठ 
    • ताज्या बातम्या
    • राजकारण
    • महाराष्ट्र

      Trending Tags

      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता
      No Result
      View All Result
      महाराष्ट्र भूमी
      No Result
      View All Result
      Home मराठवाडा छत्रपती संभाजीनगर

      दाभोलकर हत्या प्रकरणातील निर्दोष आरोपी, वकिलांचा सत्कार! भाजपा आमदाराचीही उपस्थिती

      Shubham Tagad by Shubham Tagad
      July 2, 2024
      in छत्रपती संभाजीनगर
      0
      दाभोलकर हत्या प्रकरणातील निर्दोष आरोपी, वकिलांचा सत्कार! भाजपा आमदाराचीही उपस्थिती
      0
      SHARES
      0
      VIEWS
      Share on FacebookShare on Twitter

      Narendra Dabholkar Murder case : सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचा यशस्वी बचाव करणाऱ्या एका आरोपीचा आणि वकिलांच्या गटाचा सत्कार करण्यात आला आहे.

      Narendra Dabholkar Murder case : सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचा यशस्वी बचाव करणाऱ्या एका आरोपीचा आणि वकिलांच्या गटाचा सत्कार करण्यात आला आहे. गोव्यात झालेल्या वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवात  त्यांचा सत्कार झाला. 

      दक्षिण गोव्यातील फोंडा शहरात 24 जून ते 30 जून दरम्यान हे अधिवेशन पार पडलं.  या अधिवेशनात नरेंद्र दाभोलकर हत्येतील आरोपींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांचा सत्कार करण्यात आला. तसंच या प्रकरणात निर्दोष सुटलेल्या सनातन संस्थेच्या साधकाचाही सत्कार करण्यात आला, अशी माहिती आयोजकांनी मंगळवारी (2 जुलै ) दिली.

      (‘महाराष्ट्र भूमी’ चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

      भाजपा आमदारही उपस्थित

      हिंदू जनजागृती समिती या उजव्या विचारसरणीच्या संघटनेनं या अधिवेशनाचं आयोजन केलं होतं. या संघटनेच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी या अधिवेशनाला हजेरी लावली होती.  तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा सिंह लोध यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्कार समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवलं,’ असं HJS प्रवक्त्याने सांगितले.

      नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल झालेल्या आणि नंतर न्यायालयाने निर्दोष सुटलेल्या आरोपींपैकी विक्रम भावे यांचा आमदारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर इतरांनी ॲड. प्रकाश सालसिंगकर (उच्च न्यायालय, मुंबई, महाराष्ट्र), ॲड. घनश्याम उपाध्याय (अध्यक्ष, लॉयर्स फॉर जस्ट सोसायटी, मुंबई, महाराष्ट्र), ॲड. मृणाल व्यवहारे साखरे (सदस्य, हिंदू लर्निंग कौन्सिल, पुणे, महाराष्ट्र), आणि ॲड. स्मिता देसाई (पुणे, महाराष्ट्र), यांचा सत्कार केला, अशी माहिती या प्रवक्त्यांनी दिली. अमेरिका, सिंगापूर, घाना, इंडोनेशिया, नेपाळ तसेच भारतातील 26 राज्यांतील विविध संघटनांचे प्रतिनिधीत्व करणारे 1000 पेक्षा जास्त प्रतिनिधी या 7 दिवसांच्या अधिवेशनाला उपस्थित होते.

      • मुख्यपृष्ठ 
      • ताज्या बातम्या
      • राजकारण
      • महाराष्ट्र
      • भारत
      • विश्व
      • मनोरंजन
      • व्यापार-उद्योग
      • कृषीवार्ता

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम

      Welcome Back!

      Login to your account below

      Forgotten Password?

      Retrieve your password

      Please enter your username or email address to reset your password.

      Log In

      Add New Playlist

      No Result
      View All Result
      • About Us
      • Contact Us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • ताज्या बातम्या
      • मुख्यपृष्ठ 

      © 2024 महाराष्ट्रभूमी.कॉम